जळगाव | जिल्ह्यात मंगळवारपासून गुरुवार, रविवार वगळता ४ दिवस सात केंद्रांवर सकाळी ९ ते ५ या वेळेत काेराेना लसीकरण हाेणार अाहे. शनिवारी शुभारंभाचे लसीकरण झाल्यानंतर रविवारी लसीकरण झाले नाही. पुढील लसीकरणाबाबत सूचना नव्हत्या. त्या रविवारी प्राप्त झाल्या. त्यानुसार मंगळवारी लसीकरणाला सुरुवात हाेईल.
साेमवारी यादीनुसार लाभार्थ्यांना लसीकरण केंद्राचे ठिकाण व वेळ मेसेजद्वारे कळवली जाणार अाहे. प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लस दिली जाईल. लसीकरण अाठवड्यातून मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार या चार दिवशीच हाेणार अाहे. त्यातून जाेपर्यंत कार्यक्षेत्रातील अाराेग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण हाेत नाही. ताेपर्यंत सात केंद्रांवरच लस दिली जाणार अाहे. यादी पूर्ण झाल्यानंतर केंद्राच्या ठिकाणात बदल करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.