मंगळग्रह मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात ५ रोजी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष  डिगंबर महाले  यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध कार्यक्रम झाले.

अमळनेर येथील मूळ रहिवासी तथा हल्ली वसई येथे राहणारे पुरुषोत्तम पवार यांनी त्यांचे वडील चिंधूजी पाटील-पवार यांच्या स्मरणार्थ गृह रुग्ण साहित्य म्हणून २ आय. व्ही. स्टँड, ५ सेमी फ्लॉवर बेड, ३ साईड रेल बेड, ४ क्रच, २ आय. एन. व्ही. अंडर आर्म, ३ वोकिंग स्टिक, २ नेबुलायझर इको, ५ व्हीलचेअर, ६ वाकर  मंगळग्रह सेवा संस्थेस भेट दिले. त्याचे लोकार्पण आचार्य गोपालदास महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आता हे साहित्य गरजूंसाठी संस्थेतर्फे वापरण्यासाठी देण्यात येईल.

यानिमित्ताने यापुढे मंगळग्रह मंदिराचा अधिकृत प्रसाद गोड शेव राहील असे विश्वस्त मंडळाने जाहीर केले. तसेच शुध्द व निर्भेळ दुधापासून बनविलेले, कमी साखरेचे व आगळ्यावेगळ्या चवीचे ‘मंगल पेढे ‘ ही पर्यायी प्रसाद असेल. दोन्ही प्रसाद मंदिरात उपलब्ध आहेत. यावेळी मंदिरातील मंगळग्रह देवतेची उत्सवमूर्तीची गोडशेव तुला करण्यात आली. ती गोडशेव भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आली. मंदिरातील अद्यावत ऑनलाइन व ऑफलाईन सेवेचे उद्घाटन वेब सॉफ्टवेअर डिझायनर लक्ष्मिकांत सोनार यांनी सपत्नीक केले.

यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिराव, जयश्री साबे, आनंद महाले, डी. ए. सोनवणे सह सेवेकरी सुनीता कुलकर्णी, विनोद कदम, गोरख चौधरी, उमाकांत हिरे, राहुल बहिरम, आर. जे. पाटील, आर. टी. पाटील, मनोहर पाटील, अनेक भाविक व शुभचिंतक उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.