Tuesday, September 27, 2022

मंगळग्रह मंदिराचे प्रवेशद्वार जल्लोषात उघडले

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

अमळनेर  येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे प्रवेशद्वार ७ रोजी सकाळी सात वाजता विधिवत रित्या व प्रचंड जल्लोषात उघडण्यात आले. यावेळी विश्वस्त व गणवेशधारी सेवेकर्‍यांनी वाद्य वाजवत व त्यावर ताल धरत प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत सजवलेला पालखीमध्ये श्री मंगळग्रहाची उत्सव मूर्ती ठेवून मिरवणूक काढली.

- Advertisement -

- Advertisement -

मिरवणुकीत पौराणिक गणवेशातील अबदागिरीधारक व ध्वजधारक विशेष लक्षवेधी होते. यानिमित्ताने मंदिराची मनमोहक रांगोळ्या व सर्वत्र फुलांनी सजावट करण्यात आली होती. मंदिरात विशेष महाआरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहीरम , खजिनदार गिरीश कुलकर्णी , विश्वस्त अनिल अहिरराव , डी. ए. सोनवणे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

दिवसभर भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली व मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण गंध सर्वांच्या कपाळी लावण्यात आला. मुख्य पुरोहित प्रसाद भण्डारी, मंदिराचे पुजारी तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, यतीन जोशी यांनी पौरोहित्य केले.

रोजगाराच्या संधींचे मार्ग खुले : महाले 

आज मंदिरांचे प्रवेश द्वार उघडले याचा आनंद आहे .मात्र त्याहीपेक्षा या निमित्ताने या प्रवेशद्वारातून पर्यटन व रोजगाराच्या संधीचे अनेक मार्ग खुले झाले याचा विशेष आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी दिली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या