भुसावळ (प्रतिनिधी) : येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 10 ऑक्टोबर रोजी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. नितीन बारी यांचे हस्ते संपन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजना एककच्या अंतर्गत महाविद्यालय स्तरावरुन या विभागाची स्थापना करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. आर. पी. फालक व डॉ. जी. पी. वाघुळदे उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा. नितीन बारी म्हणाले की, अध्ययन ही अविरत चालारी प्रक्रिया आहे. आयुष्याच्या कालावधीत जगतांना ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या शिकण्याचे व अनुभवण्याचे हे वय असते विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम, कार्यक्रम या माध्यमातून निरीक्षण करुन चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. त्यांचा जीवन जगतांना त्यांना नक्कीच फायदा होईल. प्राचार्य डॉ. आर. पी. फालक म्हणाले की जे ज्ञान आणि माहिती महाविद्यालयात मिळत आहे त्याचा विद्यार्थ्यांनी पूर्ण फायदा घ्यावा. तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अंतर्गत महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात सहभाग नोंदवावा. प्रास्ताविक प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी कले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. व्ही. बाविस्कर यांनी केले तर आभज्ञर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जी. पी. वाघुळदे यांनी मानले. यावेळी रासेयो विभागाचे भुसावळ विभाग समन्वयक प्रा. अनिल सावळे, प्रसिध्दी प्रमुख प्रा. डॉ. संजय चौधरी यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.