भोले महाकाल फांऊडेशनतर्फे पशु-पक्षांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था

0

बोदवड (प्रतिनिधी) : – मार्च महिना संपण्या अगोदरच जिल्ह्यात तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले असून उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीसाठा आटत चालला असून जंगलात पशु-पक्षी व वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटंकती वाढल्याने बोदवड येथील भोले महाकाल मल्टीपर्पज फांऊडेशन तर्फे परिसरातील जंगलात पाणी व अन्नाची व्यवस्था करीत भूतदयेचे दर्शन घडविले आहे.

उन्हाळ्यात जंगलातील वनबंधारे कोरडे होत असल्याने जगंलातील पशु पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.ही बाब लक्षात घेवून बोदवड येथील भोले महाकाल मल्टीपर्पज फांऊडेशनच्या वतीने जंगलातील पशुपक्ष्यांसाठी पाणी व धान्याची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी लागत असलेले साहित्य मोफत वाटप करण्यात येत आहेत.

ग्रुपचे अध्यक्ष अनिल बाबुराव गंगतीरे यांच्या प्रयत्नातून पशु पक्षांना पाण्यासाठी कुंड्या जंगल परिसरात ठेवण्यात आल्या आहेत.
फांऊडेशन तर्फे जगंलात ठिकठिकाणी कुंड्या ठेवून पाणी व खाद्यासाठी धान्य ठेवण्यात आली असून दररोज पाणी व धान्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यांनी इच्छा असेल त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व हे साहित्य हवे असल्यास त्यांनी बोदवड शहरातील मलकापूर रोडवरील गंगतीरे ऑटो येथे.संपर्क साधावा असे आवाहन फांऊडेशनचे अध्यक्ष अनिल गंगतीरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.