भडगाव तालुका बचाव कृती समितिमार्फत आमरण उपोषण सुरु
भडगाव (प्रतिनिधी) : शहरातील यशवंतनगर , टोणगाव, पेठ, कराब या भागातील भोगवटाधारक असलेल्या घरांना त्यांना त्यांचे मालकी हक्क देउन नावे त्वरीत लावण्यात यावेत. या मागणीसाठी भडगाव तालुका बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल वाघ यांचेसह पदाधिकारी आमरण उपोषणास बसले असुन दि. २८ रोजी सकाळी १०.३० वाजता यशवंतनगर भागातील मारोती मंदीराजवळ आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे.
या बाबत मागणीचे निवेदन भङगाव तालुका बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल वाघ यांनी भङगावचे तहसिलदार माधुरी आंधळे यांचेसह इतरञ निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत. या उपोषणास अनिल वाघ, हिरामण पाटील, राहुल ठाकरे, सलमानखान यांचेसह नागरीक बसलेले आहेत. याबाबत तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, भङगाव तहसिल कार्यालय, नगरपरीषद, सिटीसर्वे कार्यालय भङगाव यांना दि. ५/११/२०१९ रोजी भङगाव शहरातील यशवंतनगर, टोणगाव, पेठ, कराब या भागातील भोगवटाधारक असलेल्या घरांना त्यांना त्यांचे मालकी हक्क देउन नावे लावण्या संदर्भात निवेदन देण्यात आल्याचे नमुद केलेले आहे. यशवंतनगर हा भाग शासनाच्या पुढाकाराने बसविण्यात आला आहे. आज जवळपास ५० वर्षांपासुन या जागेत लोक राहत आहेत. काही घरे सीटी सर्वेला नावावर लागलेली आहेत. बाकीची माञ आपल्या हक्कापासुन वंचित आहेत. या संदर्भात अनेक वेळा लेखी तोंङी मागणी केलेली आहे. तरी देखील काहीच उपयोग होतांना दिसत नाही. शहरातील अशा घरांच्या ( भोगवटाधारक ) अतिक्रमणाला नियमानुकुल करण्याचा धोरणात्मक निर्णय १९९९ सालीच शासन दरबारी झाला आहे. आणि अशा प्रकारचे अनेक जि आर शासनाने मधल्या काळात काढलेले आहेत.असेही निवेदनात नमुद केलेले आहे. तरी या भागातील लोकांना त्यांच्या हक्कापासुन वंचित ठेवण्यात येत आहे. हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच आहे. निवेदने देउनही कार्यालयांना साधी दखलही घ्यावीशी वाटत नसेल तर याला काय म्हणावे? यातुन प्रशासन किती गंभीर आहे याचे दर्शन होते. म्हणुन येथील रहिवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहचवावा. त्यांना त्यांचे अधिकार मालकी हक्क त्वरीत मिळावे. या मागणीसाठी दि. २८ पासुन यशवंतनगर भागात आमरण उपोषणास सुरु करण्याचे आवाहन केले होते. निवेदनाच्या प्रती नगरपरीषद, भुमिलेख कार्यालय, भङगाव तहसिलदार, भङगाव पोलीस निरीक्षक यांचेसह इतरञ देण्यात आल्या होत्या. उपोषण स्थळी नगरसेविका योजना पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले , दलीत विकास आघाङीचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे आदिंनी भेट दिली.