भोकरबारी येथे मोफत धान्य माल वाटप

0

पारोळा | प्रतिनिधी
तालुक्यातील भोकरबारी ‌येथे कोरोना या कालावधीत पंतप्रधान गरीब योजने अंतर्गत धान्य जिल्हाधिकारी यांच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत खबरदारी घेण्याच्या आदेशाचे काटेकोर पालन करून ग्राहकांना टप्याटप्याने बोलवून व प्रत्येक ग्राहकात एक मीटरचे अंतर ठेवून सोशिल डिस्टिंनग ठेवून  सरपंच ,उपसरपंच,ग्रामसेवक, तलाठी , ग्रामपंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थित तांदूळ व धान्य मालाचे वाटप करण्यात आले.
या मोफत धान्य वाटप प्रसंगी सरपंच सौ.उमा सोनवणे उपसरपंच भानुदास पाटील ग्रामपंचायत सदस्य सौ.ज्योती रामसिंग पाटील, ललीता गव्हाणे. ग्रामसेवक प्रविण अमृतकर.तलाठी योगेश बैसाणे, रेशन दुकान दार अशोक कोष्टी गावातील प्रतिष्ठित शिवाबाबा पाटील, विनोद पाटील ग्रामपंचायत सदस्य रंजना बाई पाटील, वैशाली पाटील,सुधाकर पाटील, विनोद कोळी, आझाद गव्हाणे, भावराव गोपाळ, माजी सरपंच लालसिग पाटील, संजय मिस्तरी, संजय पाटील, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित ,आजी,माजी सरपंच, चेअरमन, व्हा चेअरमन, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.