भोकरबारी येथील तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

0

पारोळा । तालुक्यातील भोकरबारी येथील एका ३५ वर्षीय तरुण शेतकर्‍याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप प्रकाश बडगुजर (वय ३५) या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संदीप बडगुजर याने राहत्या घरातील स्लॅबच्या बंगळीच्या कडीला लेडीज रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजले नाही.

गावातील विनोद गंगाराम पाटील यांनी पाहिल्यानंतर त्यांनी उपसरपंच भानसिंग राजपूत यांना कळविले. त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर भानसिंग पाटील, गणसिंग संतोष पाटील, राहुल तुकाराम पाटील, भास्कर पोपट पाटील यांनी त्याचे पार्थिव ईश्‍वर ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले. उपसरपंच भानसिंग राजपूत यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश चौधरी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.