निंभोरा ता.रावेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रभर विखुरलेला भोई समाज महाराष्ट्राच्या विविध भागात मोठ्या संख्येने असुन सुद्धा संघटित नसल्यामुळे समाजाच्या विकासाकडे व प्रगतीकडे दुर्लक्ष होत आहे.तसेच समाजाचे प्रश्न व समस्या शासन दरबारी मांडण्यात अडचणी येत असल्यामुळे समाजाचे सामाजिक नुकसान होत आहे.
तसेच विविध सामाजिक संघटनांनी समाज हितास्तव पुकारलेले अनेक जन आंदोलने कुठेतरी अपुर्ण अवस्थेत असल्याने महाराष्ट्रात समाजाचे प्रलंबित असलेले प्रश्न हाताळण्यास सामाजिक संघटनांना अपयश येत आहे.समाज संघटित नसल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात समाजाचा राजकिय प्रभाव अत्यल्प असल्याने त्याचे दुरगामी परीणाम समाजाला भोगावे लागत आहेत .तरि येणाऱ्या काळात समाजाची ताकद व एकता दाखविण्यासाठी मा.श्री.गजानन दादा साटोटे(राष्ट्रिय महासचिव अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्था),मा.श्री.प्रकाश लोणारे(संस्थापक अध्यक्ष भोई समाज क्रांतीदल महा.प्रदेश) तसेच मा.श्री.भाऊसाहेब बावणे(संस्थापक अध्यक्ष राष्ट्रिय भोईसमाज क्रांतीदल) यांच्या नेतरत्वा खाली तसेच या परिषदेचे प्रमुख पाहुणे श्री.ऐ.के.भोई,श्री.एस.ऐ.भोई सर,श्री.जयंतराव शिक्रे,श्री.चंद्रकांत नलावडे,श्री.एकनाथ काटकर,श्री.राजेंद्र महाडिक,श्री.गणेश मोरे,श्री.बाळासाहेब मोरे,डँा.हिरामण मोरे,श्री.तुकाराम वानखेडे,श्री.दादाराव आळणे,श्री.रोहित शिंगाणे,श्री.गणेश सपकाळ ,श्री.अर्जुन भोई सर,श्री.देविदास ढोले,श्री.अभिषेक घटमाळ,श्री.अॅंड.शंकर वानखेडे,श्री.यशवंत शिवदे,श्री.आर.आर.जाधव,श्री.उक्कडराव सोनोने,श्री.संजय केवट,श्री.राजेंद्र तमखाने,श्री.न्ह्यानेश्वर खैरमोडे,श्री.कमलेश लांडगे,श्री.केशवराव आळणे,श्री.बापू तावडे,श्री.भिलेश खेडकर,श्री.महारु शिवदे,श्री.तुषार साटोटे,श्री.पंकज सुरजुसे हे उपस्थित राहणार आहेत.तसेच महाराष्ट्रातील सर्व संघटनांचे राज्यस्तरीय,जिल्हा,तालुका,शहर पतळीवरिल पदाधिकारी तसेच समाज सेवक,व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सर्व समाज बंधुनी मौलाना आझाद संशोधन केंद्र टि.व्हि सेंटर अौरंगाबाद येथे १६ फेब्रुवारी रोजी ठिक ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन भोईसमाज राज्यव्यापी एकता परिषदेचे अौरंगाबाद जिल्हा कार्यकारणी यांनी केले आहे.