भोईटे नगरातील किराणा दुकान फोडले ; ५४ हजारांचा ऐवज लंपास

0

भोईटे नगरातील किराणा दुकान फोडले ; ५४ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव : शहरातील भोईटे नगर परिसरात किराणा डिस्ट्रीब्युटर एजन्सीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५४,२०० रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफुल्ल वसंतलाल झंवर हे जळगावच्या प्रेम नगर भागात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे भोईटे नगर येथे किराणा सामान डिस्ट्रीब्युट एजन्सीचे दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

 

५१,२०० रुपये रोख रक्कम ,३,००० रुपये किंमतीचे चांदीचे शिक्के असा एकूण ५४,२०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सकाळी ८.३० वाजता चोरी उघडकीस आली, त्यानंतर दुपारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या चोरीने परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात असून, लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.