Saturday, October 1, 2022

भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली तरूणीला गंडविले

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

मूळची पाचोरा येथील रहिवासी असणार्‍या एका तरूणीची भेटवस्तू देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याची घटना समोर आलीय. आपण अमेरिकेतून भेटवस्तू पाठवत असून याच्या कस्टम ड्युटीसाठी अडीच लाखांची गरज असल्याचा बहाणा करून या तरुणीची फसवणूक करण्यात आली.

- Advertisement -

- Advertisement -

पाचोरा येथील मूळ रहिवासी असणार्‍या एका युवतीने मॅट्रीमोनीच्या साईटवर आपली माहिती ही मोबाईल क्रमांकासह अपलोड केली होती. या अनुषंगाने ४ नोव्हेंबरला एका तरूणाने संपर्क केला. आपले नाव निवांत चित्रे असे असून आपण अमेरिकेतील ग्लासगो येथे राहत असल्याची माहिती त्याने दिली. यानंतर दोघांचा फोनद्वारे संपर्क वाढला होता. यातच त्यांचे बोलणे वाढले. व यातूनच त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

त्या तरूणाने संबंधीत तरूणीला भारतात भेटवस्तू पाठवत असल्याची माहिती दिली. यात सोने व हिर्‍यांचे दागिने तसेच १ हजार पाउंडच्या नोटा असल्याचे व्हिडिओ कॉल करून दाखवलेही होते. त्याची किंमत एक कोटी रुपये असल्याची बतावणी त्याने केली होती. यानंतर संबंधीत पार्सल दिल्लीत विमानतळावर अडकले असून कस्टम ड्यूटी आणि जीएसटी भरावा लागेल, असे त्याने सांगितले.

तो जीएसटी भरण्यासाठी तिच्याकडून दोन लाख ५५,५०० रुपये मागवून घेतले. ती रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधणे बंद केले. प्रयत्न करूनही संपर्क होत नाही हे स्पष्ट झाल्यावर फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने या संदर्भात जळगावच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या