भूसावळातील बेघर नागरिकांना राज्य शासन देणार हक्काची  पाच  हजार घरे – मुख्यमंत्र्याची घोषणा 

0
खडसे बद्दल कोणतीही राजकीय पुनर्वसना बद्दल घोषणा नाही :
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम : खा . रक्षा खडसे , आ . सावकारेंची स्तुती 
भुसावळ दि . २१ –
     शहरातील विविध भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गतच्या पहिल्या टप्प्यात सुमारे पाच हजार नागरिकांना मोफत घर देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली .
गुरुवार दि. २१ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित कार्यक्रमास आले असता आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण व खा.रक्षा खडसे यांच्या कार्यवृत्तांताचे प्रकाशनासह सावदा  निंभोरा व बोदवड येथील रेल्वे ब्रीजचे ऑनलाईन उद्घाटन, नगरपालिका उद्यान लोकार्पण, प्रशासकीय ईमारत  व आमदार निधीतील उद्यानाचे रीमोटद्वारे ऑनलाईन उद्घाटन तसेच आमदार सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे आणि युवा शहर प्रमुख अनिकेत पाटील यांच्या संपर्क कार्यलयाचे उद्घाटन,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान मैदानावर उभारण्यात आलेले शहिद  स्मारकास श्रद्धांजली वाहण्यात आली .सकाळी ११ वाजेपासून जथ्थेच्या जत्थे कार्यक्रम स्थळी ढोल ताश्याच्या गजरात येत होते .कार्यक्रमास रावेर मतदार संघातील विविध गावांमधून नागरिक व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती .
  यावेळी पुढे बोलतांना  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ,पंतप्रधान आवास योजनेत कुठल्याही जाती पंथातील नागरिकात भेदभाव केला जाणार नाही सर्वाना घरे मिळणार आहे तसेच खासदार रक्षा खडसे यांनी गेल्या साडेचार वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल भारतीय जनता पार्टीचे रामभाऊ महाडिक यांनी सुरु केलेल्या परंपरेनुसार अतिशय सुदर पद्धतीने तयार करून जनतेला सदर केला आहे . भाजपामध्ये सर्वात तरुण व कार्यक्षम खासदार म्हणून खा रक्षा खडसे यांच्या कार्याचे कौतुक करीत या एकमेव खा रक्षा खडसे अश्या आहेत की ज्या त्यांच्या लोकसभा मतदार संघात शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्या असून ९५ टक्के कार्य केले आहे . हे कोणत्याही खासदाराला शक्य होत नाही मात्र जनसंपर्कांचे माध्यमातून खासदार खडसे यांनी करून दाखविल्याची  भरभरून स्तुती मुख्यमंत्री यांनी यावेळी केली .तसेच पंतप्रधान आयुष्यमान योजनेअंतर्गत तालुक्यातील पाच नागरिकांना गोल्ड कार्ड देण्यात आले तसेच जगातील आठवा अजूबा म्हणून ओळख निर्माण होणारी मेगा रिचार्ज योजनेकरिता केंद्रीय मंत्री उमा भारती, नितीन गडकरी यांचे धन्यवाद व्यक्त केले . ६ हजरत कोटींचा डीपीआर सादर झाला आहे तर सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून संपूर्ण देशाचा विकास होत आहे समृद्ध भारत तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे . शेतक-यांना दरवर्षी ६ हजार रुपये , तर असंघटित कामगारांना पेन्शन योजना सुरु करून महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे .    जम्मू मधील पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्या बद्दल पंतप्रधानांनी सेनेला खुली सूट दिली असून जी कारवाई करायची ती  करा असे आदेश दिले आहे यामुळे पाकिस्तानमध्ये लपलेले अतिरेकी शोधून त्यांचा खात्मा करून नवीन भारत तयार करू या .हा पूर्वीचा भारत देश राहिला नसून हा मोदींचा भारत आहे . शाहिद जवानांच्या पाठिशी सव्वाशे कोटी  देश बांधव उभे आहोत,  असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले .रक्षा खडसे यांना आमचा आशीर्वाद कायम असल्याचीही स्पष्टोक्ती केली . 
    व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे , केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे , खासदार रक्षा खडसे , आमदार हरिभाऊ जावळे , आमदार संजय सावकारे , आ . राजूमामा भोळे ,आ . चैनसुख संचेती ,शिवसेना आ . चंद्रकांत सोनवणे , माजी आमदार दिलीप भोळे , अध्यक्षा  उज्ज्वलाताई पाटील ,जि . प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन , जि . प. बांधकाम सभापती रजनी चव्हाण,  महापौर सीमा भोळे ,जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन , नगराध्यक्ष रमण भोळे , उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे , अशोक कांडेलकर , रमेश मकासरे , गोविंद अग्रवाल , पस सभापती प्रीती पाटील , रावेर लोकसभा संघटक हर्षल पाटील ,तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे , शहर अध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे , भाजयुमो शहर अध्यक्ष अनिकेत पाटील , नगरसेवक युवराज लोणारी , मनोज बियाणी आदी मान्यवर उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.