भुसावळ :- येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 4 वर रेल्वे अंगीकृत आयआरसीटीसी संचलित मारिया फुड्स स्टॉलचे उद्घाटन डिआरएम आर. के. यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
डिआरएम यादव म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना स्टॉल नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. आता स्टॉल सुरु झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ व शितयेय या ठिकाणी उपलब्ध होणार असून नव्याने तयार झालेले प्लॅटफॉर्म व गरज असलेल्या जुन्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा लवकरच नवीन स्टॉलसाठी रेल्वे प्रशासन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी एडीआरएम मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) राजेश चिखले, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर. के. शर्मा, विभागीय अभियंता श्री. तोमर, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक देविदास पवार, माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, हाजी मुन्ना तेली, आरपीएफ निरीक्षक विजय नायर, पप्पू सेठ, जलील कुरेशी, चिराग सेठ, हुस्नोद्दीन शेख, शंकर झुंगारेकर आदी उपस्थित होते.