Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भुसावळ स्थानकावरून गाड्या रद्द केल्याने संतप्त प्रवाशांचा स्टेशन निरीक्षकांना घेराव
    जळगाव

    भुसावळ स्थानकावरून गाड्या रद्द केल्याने संतप्त प्रवाशांचा स्टेशन निरीक्षकांना घेराव

    By July 2, 2019No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रवाशी ट्रकवर झोपले ; गोदान ,पुष्पक, महानगरी भुसावळपर्यंत

    भुसावळ :- येथुन गोदान एक्सप्रेस रद्द केल्याने संतप्त प्रवाशांनी गोदान एक्सप्रेस परत बोलावण्याची जोरदार मागणी केली.दरम्यान यावेळी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करत घोषणा दिल्या व स्टेशन मास्तर अय्यर यांना घेराव घातला.

    मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालेले असतांनाच मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला आहे. तर उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आले. दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर आज दुपारी गोरखपूर वरून मुंबईकडे जाणारी ही गाडी आली असता, या गाडीला भुसावळ रेल्वे स्टेशन वरून रद्द केल्याने प्रवाशांचा प्रचंड संताप झाला. या संतप्त प्रवाश्यानी स्टेशन निरीक्षक जी.आर.अय्यर यांना घेराव घातला व त्वरित गाडी सुरू करा व आम्हाला पोहचवा अशी मागणी केली.

    यागोंधळामुळे प्लँटफॉर्म क्रमांक 4 वर चांगलाच गोंधळ उडाला आहे. प्रवाशांचे पुढील प्रवासाचे पैसे सुद्धा परत यावेळी करण्यात येत आहे परंतु प्रवाशांचे हाल झाल्यामुळे भुसावळ रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने तात्काळ त्या ठिकाणी रेल्वे पोलिसांचा वाढीव बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

    दरम्यान महानगरी एक्सप्रेस हीगाडी  सुध्दा दुपारी 2 . 55 ला भुसावळ येथे आली. असता संतप्त प्रवाश्यानी महानगरी गाडीपुढे ट्रकवर झोपून घेतले व घोषणा दिल्या तर तेवढ्यात प्लँटफॉर्म क्रमांक 7 वर पुष्पक एक्सप्रेस आली ही गाडी सुद्धा रद्द करण्यात येऊन गाडी मधील प्रवासी यांना उतरविण्यात आले आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif