भुसावळ शहर शस्त्र तस्करांचे माहेरघर !

0

पोलिसांची धरपकड सुरु ; गावठी कट्टा , गुप्तीसह आरोपी जाळयात भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहर व तालुका पोलिस स्टेशन हद्दित गेल्या काही दिवसांपासून अनेक अप्रिय घटना घडल्या यात खून, प्राणघातक हल्ले यासह अनेक गुन्हे घडत आहे शहरात खून ,हणामाऱ्यांची मालिकाच सुरु असल्याचा अनुभव भुसावळ कराना येत आहे . पूर्वी मिनी बॉम्बे ‘म्हणून ओळख असलेल्या शाहराची पुन्हा गुन्हेगारी कडे वाटचाल हॉट आहे की काय यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. भुसावळ शहर तस्करांचे माहेरघर होण्याकडे वाटचाल होत आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्याना भेडसावत आहे .या सर्व गुन्हेगाराना नेमका कोणता व कोणाचा राजाश्रय आहे काय , शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा आला कुठून व कसा याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे . मात्र घडलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन खलबलुन जागे झाले असून पोलिसांची कुंभकर्णी झोप उडाली आहे त्यांनी त्यांची तपासचक्रे युद्धपातळीवर फिरवली आहे . या अंतर्गत सुरु केलेल्या धडक कार्यवाहित अनेक गावठी कट्टे,जिवंत काडतुसे, गुप्ती यासह आरोपींच्या मुसक्या आवळन्याकरिता धरपकड सुरु केली आहे यामध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह बाजारपेठ, तालुका व शहर पोलिसांना बहुतांशी यश आले आहे . यात प्रामुख्याने चोरवडमधून गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात भुसावळ तालुक्यातील चोरवड येथे एका संशयीताकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीताला अटक करीत त्याच्याकडून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. विजय मन्नू उजलेकर (23, रा.72 खोली, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार अनिल इंगळे, सुरेश महाजन, सुनील दामोदरे, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे आदींच्या पथकाने केली. तसेच भुसावळात धारदार गुप्तीसह दोघांना अटक शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री नवरात्रोत्सवाची विसर्जन मिरवणुक सुरू असतांना दोघे दुचाकीवरून धारदार गुप्ती घेवून फिरत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बुधवारी रात्री 9.45 वाजेदरम्यान शहरातील कुंभार वाड्याकडून महाराणा प्रताप चौकाकडे दोन जण दुचाकीवरून जात असताना नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या निवासस्थानासमोर दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीसाठी गस्त घालीत असलेले पोलीस हवालदार मोहम्मद अली सैय्यद यांंना दुचाकीवर मागे बसलेल्या एकाच्या पाठीवर शर्टाखाली एक लांब काडी लपवलेली असल्याचे दिसून आले. त्यांनी पाठलाग करून त्यांची तपासणी केली असता शर्टाच्या खाली एक हजार रुपये किंमतीची एक 28 इंच लांब धारदार गुप्ती आढळली. या प्रकरणी निलेश मधुकर चौधरी (40) व देवेंद्र लक्ष्मण वाणी (दोन्ही रा.गरूड प्लॉट, भुसावळ) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल समाधान पांडुरंग पाटील यांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बाजारपेठ पोलिसांनी सुद्धा धडक कारवाई करीत गावठी कट्टया व जिवंत काडतुसासाह कारवाई आरोपीना जेरबंद केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.