भुसावळ, दि. ११ –
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथे विजय प्राप्त केल्यामुळे आज ११ रोजी भुसावळ शहर काँग्रेस कमेटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानवाला अभिवादन करुन फटाक्यांची आतषबाजी केली तसेच काँग्रेस कार्यकत्र्यांनी जल्लोष केला.
यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रविंद्र निकम यांनी आनंद व्यक्त करत आता खरे जनतेचे अच्छे दिन हा नारा लावून नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रविंद्र निकम, रहीम कुरे
शी, भगवान मेढे, नईम शेख, काँग्रेस युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुवर्णा गाडेकर, रिटा सिल्व्हेस्टर, रेखा बोराडे, विलास खरात, राजू डोंगरदिवे, सलोनी शिरसाठ, वानखेडे, संतोष साळवे, सुनिल दांडके, प्रा. संदानशिव, सुरेश शेटे, विजय सनांसे, कलीम बेग, बाळू सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.