भुसावळ शहर काँग्रेसतर्फे गॅस दरवाढीचा निषेध

0

संविधान बचावो समितीच्या आंदोलनालाही पदाधिकाऱ्यांचे समर्थन

भुसावळ (प्रतिनिधी)-  भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे व महिला काँग्रेस कमिटीतर्फे गॅस सिलिंडर दरवाढीचा निषेध करून तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तहसील कार्यालयाबाहेर संविधान बचावो समितीच्या सुरू असलेल्या साखळी आंदोलनाला पदाधिकार्यांनी समर्थन देत आंदोलनाला लेखी पाठिंबा दर्शवला.

याप्रसंगी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, प्रदेश महिला सचिव अनिता खरारे, महिला सचिव राणी खरात, रेखा सोनवणे, वानखेडे, निकम, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, कलिम बेग, जॉनी गवळी, अन्वर तडवी, मुकुंद टेलर, सरचिटणीस शैलेश अहिरे, सलिम शेख, रवींद्र साळवे, युवक अध्यक्ष शकिल नशाभाई तडवी, ईमरान खान, संजय नरवाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.