भुसावळ शहरात विना परवाना गावठी पिस्टल बाळगतांना एकास मुद्देमालासह अटक

0

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरात विना परवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास खडका चौफुली येथे सोमवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत मुद्देमालासह अटक केली असून त्याचेविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना गोपनिय माहिती मिळाली की, खडका चौफुली भुसावळ येथे अरबाज आरीफ पटेल नावाचा इसम हा गावठी बनावटीचे पिस्टल बाळगुन आहे. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक्क फौजदार अशोक महाजन , शरीफोद्दीन काझी , युनुस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव यांना भुसावळ येथे रवाना केले होते.
गुप्त माहिती प्रमाणे खडका चौफुली ते भुसावळ गावात जाणारे इकरा मदरसाच्या रोडजवळ आरबाज पटेल या आरोपीस जागीच अटक केली.ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल त्यास वरुन प्लॅस्टीकची मुठ लावलेले रिकामे मॅक्झीन सह मिळुन आले. यावरुन आरोपी आरबाज आरीफ पटेल वय – २२ रा.पटेल कॉलनी हा गैर कायदा विना परवाना २०,०००/- रुपये कितीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.