भुसावळ विभागातील ८६ उपद्रवींना सहा दिवस शहर बंदी

0

भुसावळ :- लोकसभानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ श्रीकुमार चिंचकर यांनी भुसावळातील ३७, मुक्ताईनगर ४४, आणि वरणगाव येथील ५ अशा एकूण ८६ जणांना १९ ते २४ एप्रिल दरम्यान शहरबंदी केली असून तसे आदेश काढले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

निवडणुकीच्या पार्शभूमीअर पोलीस प्रशासनाने प्रांत कार्यालयात सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणा-या व पोलिस दप्तरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भुसावळसह मुक्ताईनगर व वरणगावातील ८६ उपद्रवींच्या विरुद्ध प्रस्ताव पाठवले होते त्या अनुषंघाने लोकसभा निवडणुकीच्या काळात १९ ते२४ दरम्यान सहा दिवस शहर बंदी करण्याचे आदेश प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी काढले असून पोलीस पथकातील कर्मचाररी उपद्रवीना शहरबंदीच्या नोटीस बजावत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.