भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील म्हसावद रेल्वे स्थानकावर विना तिकीट व अयोग्य तिकीटा वर प्रवासावर आळा घालण्याकरिता विभागातील म्हसावद स्टेशनवर शुक्रवार दिनांक. १४ रोजी “बस रेड ” तिकीट तपासणी करण्यात आली . ही तपासणी भुसावळ विभागातील वरिष्ठ वाणिज्य प्रबधंक आर. के.शर्मा , सहाय्यक वाणिज्य प्रबधंक अजय कुमार (टी .जा)यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . म्हसावद स्टेशन वर तिकीट तपासणीमध्ये एकूण ४० तिकीट तपासणी पथक ,१५ आर पी एफ स्टाफ यामध्ये ४ महिला तिकीट तपासणी कर्मचारी यांचा समावेश आहे .
४८७ अनियमित प्रवास प्रवासी पकडण्यात आले . यांचे कडून दंडाचे स्वरुपात २५१३७५ रुपये वसूल करण्यात आले .
या मोहिमेत वीना टिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यां विरुद्ध 131 केसेस करण्यात येवून दंड वसूल करण्यात आला. आणि विना बुकिंग सामान घेवून प्रवास करणाऱ्यां एका प्रवाश्या कडून २०० रूपयांचा का दंड वसूल करण्यात आला . यावेळीदंड रक्कम भरण्यास असमर्थ प्रवासी विरुद्ध कलम १३७ अन्वये कारवाई करण्यात आली . तसेच अन्य तिघांचे विरुद्ध कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात आली . तर ४ प्रवाश्यांविरुद्ध कलम १४५ बी अन्वये कारवाई करण्यात आली .
या मोहिमेत वाय.डी.पाठक मुख्य तिकीट तपासणी निरीक्षक , सोबत एटीएस स्क्वाड ,प्रोसिक्यूशन स्क्वाड, आईसीपी चेक्स, सजंग स्क्वाड, ओडी स्टाफ, तसेच तिकीट तपासणी स्टॉफ कर्मचारी यांनी कारवाई केली.
सदर तपासणी ही अप व डाउन या दोन्ही मार्गावरिल गाड्यांची करण्यात आली यामध्ये झेलम एक्सप्रेस , भुबनेश्वर एक्सप्रेस , महानगरी एक्सप्रेस , सचखंड एक्सप्रेस , मुंबई पैसेंजर , गोवा एक्सप्रेस , पाटलिपुत्र एक्सप्रेस , गोदान एक्सप्रेस , पनवेल एक्सप्रेस , काशी एक्सप्रेस , गुवाहटी एक्सप्रेस , पुष्पक एक्सप्रेस या अप गाड्यांचा समावेश आहे तर डाउन मार्गावरिल महानगरी एक्सप्रेस , वाराणसी सुपर एक्सप्रेस , महाराष्ट्र एक्सप्रेस , देवळाली शटल , रत्नागिरी एक्सप्रेस , गोवा एक्सप्रेस , गीतांजलि एक्सप्रेस , काशी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे .
प्रवासी नागरिकांनी योग्य तिकीटावरच प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे