भुसावळ (प्रतिनिधी)- कोविड महामारीमुळे सर्वत्र प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नव्हती. आता रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनुसार भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांवर दिनांक 11 मार्च पासुन ते दिनांक 10 जून 2021 पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट सुरू केले जात आहे. ज्याचे मूल्य 50 रुपये असेल, ते केवळ या नामांकित स्थानकांवर लागू होतील. हे नामांकित स्टेशन पुढीलप्रमाणे आहे –
नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा