यावल – सातपुडा पर्वतरांगेतील व भुसावळ लघु पाटबंधारे बांधकामउपविभागातील सिंचनाची बांधकामाचे काम अभियंता अमित तपासे यांच्या मनमानी
कारभारामुळे अनेक काम रखडल्याने त्यांची त्वरित बदली करा असे यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, यांनी निवेदन राज्याचे जलसंपर्दा मंत्री ना. जयंत पाटील यांना दिले आहे तसेच दिलेल्या निवेदनातून त्यांनी मागणी केली आहे. यावल – रावेर – चोपडा तालुक्यातील व भुसावळ उपविभाग लघु पाटबंधारे बांधकाम खात्यातील अनेक काम रखडलेले असून गेल्या एक वर्षापासून येथील लघु पाटबंधारे बांधकाम उप विभागाची अभियंता अमित तपासे यांच्यासह सोळा अधिकाऱ्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातून तापी पाटबंधारे विभागात उत्तर महाराष्ट्रात मनाविरुद्ध बदल्या झाल्याने ‘ते ठेकेदारांना काम करण्यास त्रास देऊन
त्यांची मानसिक स्थिती बिघडवत आहे व पदाचा दरुपयोग करतात, धमकावतात असा आरोप येवले यांनी केला आहे.
सातपुड्यातील कामे करण्याची त्यांची मानसिक स्थिती दिसत नसून काम होत न नसल्यामुळे यावल रावेर चोपडा तालुक्यातील सातपूडयातील धरणाचे काम न झाल्यामुळे शेतकरी शेतमजूर नाराज होताना दिसत आहेत . व भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी या धरणाची काम होणे गरजेचे असून त्यात चोपडा तालुक्यातील हंड्या कुंड्या, यावल तालुक्यातील वाघझिरा, निंबादेवी, हरीपुरा, – बोरखेडा, सांगवी (काळा डोह) रावेर
तालुक्यातील चिंचाटी, लोहारा, माथ्रण नाला, गंगापूरी, मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा, भुसावळ तालुक्यातील कुर्हा,
जळगाव तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, यांची कामे अपूर्ण आहेत यावल तालुक्यातील उत्तर महाराष्ट्रातील माती बांधाचा हरीपुरा हे धरण सांडव्याचे काम बाकी आहे तर निंबा देवी पाझर तलावाची थोडेफार काम बाकी आहे या दोन्ही ठिकाणची काम झाल्यास सातपुड्यातील पर्यटन स्थळ विकासात भर होणार असून शासनाला मोठा महसूल या पासून मिळणार आहे दहा ते
पंधरा वर्षापासून बहुतांशी महत्त्वाकांक्षी कामी त्यांची अपूर्ण असून शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांचीही
मानसिकता व पत्रव्यवहार करणे महत्त्वाचे
असतात मात्र लघु पाटबंधारे बांधकाम भुसावळ विभागाचे अभियंता अमित तपासे यांचे या ठिकाणी लक्ष लागत नसून त्यांची
लवकरात लवकर इतरत्र बदली करावी व आमच्या विभागातील चांगल्या सक्षम अशा काम करणाऱ्यअधिकाऱ्याकडे येथील चार्ज देण्यात यावा अपूर्ण कामे पूर्ण झाल्यास – सातपुड्यातील नद्यांमधून वाहून जाणारे पावसाळ्यातील पाणी धरणात अडकल्यास उर्वरित नदी नाल्यातून पाणी वाहिल्यास विभागातील भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावेल व परिसरातील शेतकरी वर्गाला दुष्काळाला तोंड देता येणार असून उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे याचा मंत्रीमहोदयांनी त्वरित विचार करून त्यांची तात्काळ इतरत्र बदली करावी व या ठिकाणी सक्षम व काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच बदली करावी, असे निवेदन जलसंपदामंत्री ते नामदार जयंत पाटील यांच्याकडे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले यांनी केली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.