भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष तिकीट तपासणी मोहीम ; 52 हजार रुपये दंड वसुल ;

0

भुसावळ (प्रतिनिधी)- कोरोना साथीच्या काळातही रेल्वे प्रशासन सावधगिरीने आपले काम करीत आहे, या गंभीर साथीच्या काळातही मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विना तिकिट प्रवास करणारे ,अनियमित तिकीट प्रवास करणारे ,  ज्येष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर , अनियमित यात्रा करणारे साठी विशेष तिकीट तपासणी मोहीम  दिनांक 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

भुसावळचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक  युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुण कुमार ,विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय डी पाठक  यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिममध्ये एकूण 93 अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आल आहे. 14 तिकीट तपासणी कर्मचारी  आणि 6 आर.पी.एफ कर्मचारी यांनी  प्रवाशांकडून एकूण 52045/- रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या मध्ये जे दंड भरण्यात असमर्थ होते त्यांच्यावर धारा 144 नुसार 4 केसेस ,धारा 137 नुसार 4 केसेस यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.

सर्व प्रवाशांनी योग्य तिकिटासह प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे भुसावळ विभागातर्फे  करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.