भुसावळ :- भुसावळ रेल्वे विभागातर्फे आज दि.१५ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आबेडकर यांची १२८ वी जंयती साजरी करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानी डीआरएम् आर के यादव, अपर मंडल प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ट मंडल कार्मिक अधिकारी एन डी गागुर्ड़े, वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक आर के शर्मा, वरिष्ट परिचालन प्रबंधक स्वप्निल नीला, वरिष्ट मंडळ अभियंता राजेश चिखले आणि इतर वरिष्ट अधिकारी आणि कर्मचारी उपस्तित होते.
सर्व प्रथम डॉ.बाबासाहेबांच्या फोटोला फुलहार अपर्ण करुन पूजा करण्यात आली. त्यानंतर प्रार्थना म्हणण्यात आली. दि.14 रोजी ऑफिस ला सुट्टी असल्यामुळे हा कार्यक्रम आज दि.15 एप्रिलला करण्यात आला. यावेळी डी आर एम सभागृहात डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावरचे फोटो आणि कला साहित्याचे उदघाटन आर.के.यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याप्रसंगी डीआरएम् आर. के. यादव यानी डॉ.बाबासाहेबांबद्दल आपले विचार मांडले. डॉ.बाबासाहेबांना लहानपनापासून शिक्षणामध्ये आवड होती. डॉ.बाबासाहेबां खुप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे डॉ.बाबासाहेबां वडिलांनी उच्च शिक्षित बनायला सांगितले. साहेबानी पूर्ण विश्वाचा संविधानाचा अभ्यास केला व भारतीय संविधान तयार केले. रिझर्व बँकेची स्थापना केली. डॉ.बाबासाहेबांचे विचाराचे सर्वानी अनुकरण करायला पाहिजे. त्यानंतर अप्पर रेल मंडल प्रबंधक मनोज सिन्हा यानी भाषण केले. शुद्ध–अशुद्ध विचारांमध्ये समान अधिकार केले. डॉ.बाबासाहेबांना नऊ भाषा येत होत्या. बाबासाहेबांनी शिक्षणामध्ये सर्वात जास्त पदव्या घेतलेले एकमेव आहे. त्यानंतर वरिष्ट मंडल कार्मिक अधिकारी एन. डी.गागुर्ड़े यांनी भाषण केले. यावेळी सीआरएमएस एनआरएमयू ,SCSTएस सी एस टी असोसिएट्स व ओबीसी असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली. यावेळी सर्व कर्मचारी आणि अधिकारी उपस्थितीत होते.