भुसावळ :- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात प्रवाशांच्या सुविधेकरिता भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन नवीन फलाट (प्लँटफॉर्म ) उद्या दि.२३एप्रिल मंगळवार पासून सुरू करण्यात येत आहे .नवीन निर्मित फलाटानां नवीन क्रमांक देण्यात आले असून जुना फलाट क्रमांक २ पूर्णतः बंद करण्यात आला आहे .
फलाट क्रमांक याप्रमाणे –
नवीन निर्मित फलाटास क्रमांक ०१ देण्यात आला आहे तर
दुस-या नवीन फलाटास ०२ क्रमांक देण्यात आला आहे तर जुना फलाट क्रमांक १ चा यापुढे आता ०३क्रमांक असेल . जुना फलाट क्रमांक २ पूर्णपणे बंद करण्यात आला आहे .तर जुना फलाट क्रमांक ३ यापुढे क्रमांक ४ असा राहील तर जुना फलाट क्रमांक ४आता क्रमांक ५असा राहील .तर जुना फलाट क्रमांक ५ हा नव्याने ५ए प्रमाणे असेल.जुना फलाट क्रमांक ६ यास तोच ०६ क्रमांक राहील .तसेच ७व ८फलाट क्रमांक तेच राहतील .
नवीन निर्माण केलेले फलाट मंगळवार पासून सुरू होणार असून यावरून मेल, एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्याची ये जा सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे .
प्रवाश्यानी प्लँटफॉर्म क्रमांकात झालेले बदल लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे .