भुसावळ रेल्वेस्थानक परिसरातील पुरातन वृक्ष कोसळले ; चार चाकी वाहनाचा चुराडा:

0

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर असलेल्या व रेल्वे पोलिसांच्या पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागून असलेले शंभर वर्षापूर्वीचे जुने मोठे कडूलिंबाचे वृक्ष अचानक कोसळल्याने फार मोठा अनर्थ टळला , मात्र दक्षिणेकडील प्रवेशद्वाराच्या च्या डाव्या हाताला असलेल्या रेल्वे पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागून असलेल्या चार चाकी वाहन तळावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात अमरावती येथून तपास कार्यासाठी आलेले पोलीस य्या घटनेत बालंबाल बचावल्याची घटना २८ रोजी रात्री ९:३० सुमारास घडली. यावेळी झाड कोसळण्याच्या मोठ्या आवाजाने प्रवासी अक्षरशः भयभीत झाले व सैरावैरा पळत सुटले.

सुमारे हे शंभर वर्षापूर्वीचे जुने मोठे कडूलिंबाचे वृक्ष अचानक कोसळले त्या वेळेस पार्किंगमध्ये चारचाकी व दुचाकी वाहने मोठ्या संख्येने उ़भी होती. वृक्षाखाली चार चाकी क्रमांक एमएच-२७-एआर- ६८८१ यामध्ये अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील गोपाळ सोलंकी, पंकज नळकांडे व प्रमोद ज्ञानदेव वाघ हे तिघे राहणार अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी भुसावळ येथील रेल्वे पोलिसांच्या मदतीने एका गुन्ह्याच्या शोध कामासाठी आले होते यावेळी याच झाडाखाली गाडी मधून बाहेर पडणार इतक्यात हे डेरेदार जुने वृक्ष कोसळले सुदैवाने गाडीत मागील सीटवर बसलेले दोघे कर्मचारी अवघ्या चार इंचच्या अंतराने बालंबाल वाचले .मात्र या घटनेत मागच्या सीटचा व डीक्कीचा चुराडा होऊन नुकसान झाले. तसेच गाडी क्रमांक एमएच-१८- सीएफ-५५५८ या गाडीच्या बॉनेटवर उभे असलेले मझहर शेख हे चार सेकंदा पूर्वीच गाडीत बसले गाडीच्या जवळ वृक्षाची मोठी फांदी पडली तर चार चाकी क्रमांक एम एच-१९- ६५८८ व एम एच- २०-७१४४ या चार चाकी गाड्या सह अन्य दोन दुचाकी गाड्या वृक्षाखाली चक्काचूर झाल्या. त्वरित घटनास्थळी रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे अरुण इंगळे जाधव यासह ह् कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, व दबलेल्या वृक्षाखाली दबलेल्या गाड्या काढण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न करताना दिसून आले.

दरम्यान रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या ताजुद्दिन बाबाचां दर्गा रेल्वे प्रशासनातर्फे हलवण्यात येणार असल्याने याचा प्रकोप म्हणून भलेमोठे वृक्ष अचानक कोसळले. दर्गा हटवण्याच्या हट्ट केल्यामुळेच ही घडली घटना घडली अश्या भावनिक चर्चेला परिसरात उधान आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.