भुसावळ येथे 50 वर्षीय व्यक्तीची हत्या

0

जळगाव ;-भुसावळ शहरात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली  असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाच्या जवळ दि.२४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल यांच्यावर अज्ञात मारेकर्‍यांनी प्राणघातक हल्ला केल्याने यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने पोलीस प्रशासनावर आधीच बंदोबस्तावर असतांना रात्री झालेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

शहरातील मध्यवर्ती परिसरात दिलीप जोनवाल ( वय ४९, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ ) यांचा खून झाल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या कृत्याला पूर्व वैमनस्याची जोड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. तर मयत दिलीप जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.