भुसावळ येथे सामाजिक न्याय दिन साजरा

0

भुसावळ – येथील शिक्षण विभाग पंचायत समितीतर्पेâ राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.

सकाळी १० वाजता म्युनिसिपल हायस्कुल येथून समता दिंडी काढण्यात आली. प्रभारी गटविकास अधिकारी एस. डी. पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून दिंडीस सुरुवात केली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, सुमित्र अहिरे व गटसाधन वेंâद्रातील कर्मचाNयांसह शिक्षक उपस्थित होते. दिंडीत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. विद्याथ्र्यांनी सामाजिक न्याय दिनाविषयी घोषणा दिल्या. हि दिंडी पंचायत समिती कार्यालयापर्यंत काढण्यात आली. तेथे रागिणी चव्हाण राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. सुमित्र अहिरे व रागिणी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले तर गटविकास अधिकारी एस. डी. पाटील यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विद्याथ्र्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी कार्यालच अधिक्षक राजेंद्र शिंदे, श्री. तडवी उपस्थित होते. प्रसंगी सागर वाणी, दिपक चौधरी, अल्तमश शेख, धीरज सपकाळे, यश सोनवणे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचा विद्यार्थी प्रतिनिधी गुरूचळ या विद्याथ्र्यांचा तर सुनिल पाठक, मिलींद बोंडे, डॉ. जगदीश पाटील व विजय मंगलानी या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन सुमित्र अहिरे यांनी तर आभार डॉ. जगदीश पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.