भुसावळ (प्रतिनिधी)- प्रवासा दरम्यान गाडीत प्रवाशाची बैग राहून (सुटून ) गेलेली बैग प्रवाश्याला मिळवून देणाऱ्या विशेष तिकीट निरीक्षकांचा मंडळ वाणिज्य कार्यालय भुसावळ येथे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या हस्ते आज 6 जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला.
या सन्मानार्थ .रामकर प्रसाद राम, अनिल सोनी खंडवा आणि कमलेश बुरहानपूर या तिकीट निरीक्षक यांना प्रशस्तीपत्र देऊन सम्मानित करण्यात आले. कर्तव्याप्रति निष्ठा आणि निस्वार्थ असलेले निरीक्षक यांनी प्रवाशांचे गाडी मध्ये राहून गेलेले सामान परत मिळवून दिले आणि त्यांनी प्रवाशाला नि: स्वार्थपणे मदत केली.
“भारतीय रेल्वे आपल्या सेवेसाठी” रेल्वे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. उप-मुख्य तिकिट निरीक्षक, रामकर प्रसाद राम आणि अनिल सोनी खंडवा स्टेशन येथे कार्यरत असलेले यांनी प्रसंगावधाने गाडीत सुटलेली प्रवाशाची बॅग परत केली.
दिनांक 02.01.2021 रोजी दुपारी 3 च्या सुमारास, गोवा एक्स्प्रेस ने कार्य करून7 खंडवा येथे आले आणि दोन्ही कर्मचारी कार्यालयात पोचले तेव्हाच पवन एक्स्प्रेस देखील प्लॅटफॉर्म एकवरून रवाना झाली. तेवढ्यात अचानक एक प्रवासी त्याच्या पत्नीसह त्याच्याकडे आला. दोघेही एकदम परेशान होते की ते नुकतेच जबलपूरहून पवन एक्स्प्रेसने खंडवा येथे आले असल्याचे प्रवाशांनी सांगितले. एस -3 कोचमध्ये 18 आणि 19 चा बर्थ होता. गाड़ी मधून उतरल्यावर कळले की लॅपटॉप व आवश्यक कागदपत्रे असलेली बॅग ते बर्थ क्रमांक 19 वर राहून गेली आहे .
हे ऐकून तिकीट निरीक्षक रामाकर प्रसाद राम यांनी विलंब न करता ताबडतोब पवन एक्सप्रेसच्या ऑन ड्यूटी टीटीईला शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच वेळी बुरहानपुरात कार्यरत टीटीई कमलेश यांना संपूर्ण घटना सांगितली. या माहितीमुळे पवन एक्सप्रेस बुरहानपूरला पोहोचताच कमलेश हे कोच क्रमांक एस-3 मधील बर्थ क्रमांक 19 ला पोहोचले आणि त्यांनी बॅग तिथे ठेवलेली असल्याचे पाहिले.
ती बॅग त्यानी आपल्या जवळ घेतली . श्री राम यांनी बुरहानपूरच्या टीटीईला खंडवाकडे येणार्या ताप्ती गंगा एक्स्प्रेसमधून बॅग्स खंडवा येथे आणण्यास सांगितले. त्यानंतर श्री कमलेश यांनी ती बॅग ताप्ती गंगा एक्स्प्रेस ने बुरहानपुर येथून खंडवा येथे बॅग्स पोचविली जिथे श्री राम, श्री सोनी आणि प्रवासी उपस्थित होते. आणि बॅग्स प्रवाशी यांना सुपुर्द करण्यात आली
अशा सहकार्याने, प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी रेल्वे प्रशासनाचे कौतुक केले.
याची दखल घेत प्रशासनाकडून त्यांचा यथोचित्त सन्मान करण्यात आला. मंडल वाणिज्य प्रबंधक बी अरुण कुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (टी.जा .) श्री अनिल पाठक यावेळी उपस्थित होते.