भुसावळ येथे लिप्टच्या डकमध्ये पडल्याने यावलच्या लिपिकाचा मृत्यू

0

भुसावळ (प्रतिनिधी)– यावल तहसील कार्यालयात आवक-जावक विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेले भुसावळ येथील रहिवासी प्रशांत अशोक पाटील (३५) या तरुणाचा शहरातील जळगाव रोडवरील अयोध्या नगरातील बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमधील लिप्टच्या डकमध्ये पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, जखमी अवस्थेत प्रशांत अशोक पाटील हे नागरीकांना आढळल्याने त्यांना नशिराबाद जवळच्या गोदावरी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत झाले असल्याचे घोषित केले. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जळगावरोडवरील अयोध्या नगरात बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमधील लिफ्टच्या डक्टमध्ये प्रशांत पाटील पडल्याने गंभीर जखमी झाले होते. बुधवारी सायंकाळी घडेल्या या घटनेनंतर जखमीला नातेवाईकांनी व मित्र परीवाराने तत्काळ गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवले मात्र उपचारापूर्वीच डोक्याला अधिक मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी बोदवड तहसील कार्यालयात सेवारत आहेत. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.