भुसावळ-;- येथील रेल्वे विभागाच्या विभागीय उपयोगकर्ता सल्लागार समितीची १६१ वी बैठक२१जून रोजी दुपारी ३ वाजता विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या सभागृहात विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर के यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मनोज सुनील मिश्रा विभागीय वाणिज्य व्यवस्थापक वी.पी.दहाट, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अरुणकुमार, अजयकुमार,शयाम कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत समिती सदस्य विजय बाफना बुलढाणा,नितीन बंग धुळे, महेश पाटणकर नाशिक, गयानप्रकाश खंडेलवाल अकोला,ललित बराडिया जळगाव,मनोज सोनी खंडवा,राजेश झंवर,अनिकेत पाटील भुसावळ, महेंद्र बुरळ मलकापूर,धर्मा पाटील पाचोरा,किशोर बोरकर अमरावती,वसंत बाछूका अकोला,रवी मलानी नेपानगर, गनी मेनन जळगाव हे सदस्य उपस्थित होते. बैठकीत रेल्वे अधिकारी आणि सदस्यांनी विविध रेल्वेस्थानकावरीलन सुविधांबद्दल चर्चा केली. सर्व सदस्यांचे रेल्वे विभागाने आभार मानले.