भुसावळ-यावल रस्त्याच्या कामाला जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने सुरवात !

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल रस्त्यावरील यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या पाचशे मीटर रस्ता  कामाला आज २१ एप्रिल मंगळवार रोजी प्रारंभ झाला असून यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर यावल रस्त्याचे बंद पडलेले काम केव्हा होईल या चिंतेत असलेल्या होईल नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गुरूवार, २३ जानेवारी रोजी आमदारांच्या उपस्थितीत या कामास सुरुवात झाली होती. मात्र काही दिवसातच काम बंद पडल्याने वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती तर रस्त्याचे काम  व्यवस्थित होत नाही ते योग्यरीतीने व्हावे  या कारणास्तव हे काम बंद ठेवण्यात आल्याचे त्यावेळी सांगितले जात होते व त्यानंतर २१ मार्च पासून कोरोना विषाणुचे  संकटदेशावर आल्यानंतर कामाला पुन्हा ब्रेक लागला होता मात्र आमदार संजय सावकारे व सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकार्‍यांकडे या रस्त्याच्या कामाबाबत रवानगी मागितल्यानंतर नियम व अटींना अधीन राहून कामाला परवानगी देण्यात आली आहे. अखेर या कामाला पावसाळ्यापूर्वी  मंगळवार पासून प्रत्यक्षात  सुरुवात झाल्याने नागरिक व वाहनधारकांनी  समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.