भुसावळ बियाणी मिल्ट्री स्कुल मधील मुलांना विषबाधा

0

खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल ;तिघांची प्रकृती चिंताजनक

भुसावळ :- येथील बियाणी मिलटरी स्कुल मधील (स्विमिंग पूल) जलतरण मध्ये पोहावयास गेलेल्या विद्यार्थ्याना पाण्यात उतरल्यानंतर अवघ्या काही वेळात त्रास होऊन मुलांना चक्कर, खोकला व उलटी होऊन मूर्च्छित झाल्याची घटना दि 26 रोजी येथे घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. अचानक ही घटना झाल्याने पालक व महिला अत्यंत भयभीत झाल्या होत्या. जलतरण तलावात जवळपास 39 मुले होती त्यापैकी 25 मुलांना हा त्रास जास्तच प्रमाणात झाला त्यांना शहरातील डॉ राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सायंकाळपर्यंत मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉ मानवतकर यांनी दिली.

प्रतिवर्षी सुटयांमध्ये शहरातील बियाणी मिल्टरी स्कुल येथील जलतरण तलावात पोहण्याचे प्रशिक्षण घेण्याकरिता व काही विद्यार्थी पोहण्याचा आनंद घेण्याकरिता येथे येतात .दरवर्षी येथे महिन्याच्या कालावधी करीता समर कॅम्प चे आयोजन करण्यातही येते . आज दिनांक 26 रोजी सकाळी 7 च्या सुमारास विद्यार्थी व काही पालक आपल्या मुलांना पोहण्याचे सरावा करीता नित्यनियमा नुसार घेऊन आले . मुले पोहण्याकरिता पाण्यात उतरली मात्र काही वेळातच त्यांना अचानक चक्कर येऊन उलट्या होऊ लागल्या तर काहींचा श्वास गुदमरू लागला .क्षणात तलावा मधील सर्वाना त्रास सुरू झाला व अवघ्या पाच मिनिटांचे आत तलावातील सर्व पाणी काळे पडले .मुलांना खोकला येऊ लागला  पालकांनी त्वरित मिळेल त्या वाहनाने कसेबसे आपल्या पाल्यांना डॉ मानवतकर सह शहरातील काही खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले .

सकाळी जामनेर रोड वर रस्त्याने उलटी करणारे विद्यार्थी पाहून खळबळ उडाली होती तर मिल्ट्री स्कुल कर्मचा-यांची तारांबळ उडाली होती.दरम्यान सकाळी गंभीर असलेल्या सर्व मुलांची प्रकृतीत सायंकाळ पर्यंत सुधारणा झाली होती .प्रकारामुळे पालक वर्ग अत्यंत नाराज झाला असून काहींनी संताप व्यक्त केला .पाण्यात क्लोरीनचे प्रमाण जास्त झाल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात होते .पाण्याला क्लोरीनचा वास येत होता .

दरम्यान घटनेचे वृत्त समजताच संचालक मनोज बियाणी यांनी त्वरित  मिल्टरी स्कुल सह रुग्णालयात धाव घेतली व परिस्थितीची पाहणी केली .कर्मचा-यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे त्याची चौकशी होऊन कारवाई करणार आहे तसेच  आजचा प्रसंग अत्यंत  वाईट घडलेला आहे मी पालक व पाल्यांच्या पाठीशी सदैव आहे व राहिल त्यांनी कोणतीही काळजी करू नये .असे म्हणून संबंधित सर्व पालकांची माफी मागितली तसेच जलतरण तलावातील सर्व पाणी काढून टाकण्यात आले व तलाव स्वच्छ करून नवीन (दुसरे चांगले ) पाण्याने भरून पुन्हा सुरू केले असल्याचेही मनोज बियाणी यांनी सांगितले .

Leave A Reply

Your email address will not be published.