भुसावळ( प्रतिनिधी) – येथील गैसिया नगर भागातील भारत बंदच्या दिवशी कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जमावाचा फायदा घेऊन दगडफेक करणाऱ्या दोन आरोपींना सोमवार 3 रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बहुजन क्रांती मोर्च्याने दिनांक 29 जानेवारीला एन.आर.सी/ सी.ए.ए./इ.व्ही.एम. विरुद्ध भारत बंदचे आवाहन केले होते.भारत बंदला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविल्यामुळे शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
दरम्यान व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यासाठी आलेल्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न करीत असतांना जमावातील मुख्य आरोपी शेख शाहरुख शेख अजगर वय 23 राहणार गैसिया नगर तसेच शेख मुजफ्फर शेख हनिफ वय 20 राहणार गैसिया नगर भागातील असून दोघांना दिनांक 3 फेब्रुवारी रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप परदेशी, पो.हे.काॅ.सुनील जोशी,पो.हे.कॉ.आयज सैय्यद, पो.ना.रवींद्र बिऱ्हाडे,रमण सुरळकर,पो.काॅ.विकास सातदिवे, रवींद्र तायडे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे अशांनी आरोपीस ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गु.र.न. 38/2020 कलम 307,353, 141, 142,143,144,149,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.