भुसावळ पालिकेची डिसेंबरअखेर केवळ २ कोटी ४० लाखांची करवसूली

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  नाशिक विभागातील एकमेव अ वर्ग नगरपालिका असलेल्या भुसावळ पालिकेला यंदा मार्च अखेर ४० कोटी रुपयांची मालमत्ता करवसूली करावयाची आहे. यात चालूवर्षाची १५ कोटी तर मागील थकबाकी २५ कोटींची आहे मात्र डिसेंबर अखेरपर्यंत केवळ सहा टक्के अर्थात २ कोटी ४३ लाखांची करवसूली झाली आहे. करवसूली रखडल्याने नागरीकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवरही परीणाम शक्य आहे.

शहरात गेल्या दहा ते १२ वर्षांपासून पालिकेची थकबाकी वसूलीचे प्रमाण अल्प आहे. जेमतेम ५० टक्के थकबाकी वसूल होत नाही. पालिकेची यंदा मालमत्ता थकीत कर वसूलीची मागणी ४० कोटी रुपये आहे. त्यात चालू वर्षीचे १५ कोटी तर गेल्या काळातील थकबाकी २५ कोटींची आहे. डिसेंबर अखेरपर्यंत केवळ २ कोटी ४३ लाख रुपये वसूल झाली आहे.वसुलीचे प्रमाण अल्प असल्याने  शहरातील नागरीकांना सोयी सुविधा कशा मिळतील? असा प्रश्न आहे. गेल्या १२ ते १५ वर्षांपासून नागरिकांना आरोग्य, पथदिवे, पाणीपुरवठा, दैनंदिन स्वच्छता आदी सुविधा मिळत नाहीत. यामुळे करदाते कर भरत नाही तर दुसरीकडे करदाते कर भरत नसल्याने आगामी काळात पालिकेला मिळणाऱ्या अनुदानाच्या रक्कमांमध्ये कपात होण्याची भिती आहे. १५ व्या वित्त आयोगातील निधीला कर आकारणी व वसूलीची तरतुद आहे. यामुळे पालिकेने करवसूली वाढविणे तसेच आगामी काळात चांगल्या दर्जेदार सुविधांसाठी नागरिकांनी कर वेळेत भरणेही गरजेचे आहे.

पालिकेच्या करदात्यांना सुविधा मिळण्यासाठी यंदा धडक वसूलीही गरजेची आहे. यामुळे आता फेब्रुवारीपासून थकबाकीदारांच्या घरासमोर तुतारी व डफ वाजविणार आहे. यासोबतच थकबाकीदारांच्या याद्या शहरातील मध्यवर्ती भाग, चौकांमध्ये लावल्या जातील. यानंतर कायदेशिर कारवाई देखील होईल, यामुळे वेळेत थकबाकी भरुन पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.