भुसावळ : येथील नगरपालिकेतील मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर नाशिक येथील महानगरपालिकेचे उपायुक्त रोहीदास दोरकुळकर यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी दि. १८ रोजी भुसावळ पालिकेत येऊन मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला. पदभार स्विकारताच त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सर्व खातेप्रमुखांशी कामकाजासंदर्भात आढावा घेत अवश्यक सुचना केल्या.
याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, बांधकाम सभापती अमोल इंगळे, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर, नगरसेवक पिंटू कोठारी, नगरसेवक मुकेश गुंजाळ, आरपीआय (गवई गटाचे) जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी, आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, माजी नगरसेवक वसंत पाटील, राजेंद्र आवटे आदींनी नुतन मुख्याधिकारी रोहीदास दोरकुळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान सत्काराला उत्तर देतांना आगामी काळात भुसावळ शहराच्या विकास कामांना चालन अदेणार अस्ल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकाऱ्यानी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
मुख्याधिकारी रोहीदास दोरकुळकर यांनी पालिकेत येऊन कारभार स्विकारल्यानंतर सर्व खातेप्रमुखांशी कामकाजासंदर्भात आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेण्याकडे जळगावकडे दुपारी १.४० वाजेनंतर रवाना झाले.