भुसावळ नगरपालिकेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी

0

प्रतिनिधी / २२
भुसावळ : गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने भुसावळ स्वच्छ शहर पुरस्कार जाहीर केला असून केंद्र सरकारच्या नॅशनल फिल्म पथकाने शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या ठिकाणाची व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे कार्य आज २२ रोजी पासून सुरु झाले. या मुद्यावरुन  सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाली.


स्वच्छ शहर पुरस्कार मिळाला त्याबद्दल दीनदयाल नगरातील भागाचे व्हिडिओ चित्रीकरण नॅशनल फिल्म पथकाकडून चालु असतांना या प्रभागातील कामांबाबत नागरिकांशी पथकातील अधिकारी चर्चा करत असतांना जनाधार विकास पार्टीचे नगरसेवकांसोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी येथील रहिवासी करीम शहा याला अनोळख्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.तर असे काहीही घडले नसून उलट सत्ताधाऱ्यांनीच आम्हास दमदाटी केल्याचा आरोप जनाधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे यांनी केला.नॅशनल फिल्म पथकाचे अधिकारी हे काळी वेळानंतर नगरपालिकेकडे रवाना झाले. पथकातील अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांच्याशी चर्चा करुन झालेल्या घटनेची माहिती दिली. काही वेळात  तेथे जनाधार विकास पार्टीचे  नगरसेवक व कार्यकर्ते पोहचले. तेथे अगोदरच उपस्थित असलेल्या भाजपा नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर व जनाधाराच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक  झाली. ·
——विरोधकांकडून धमकावण्याचा प्रयत्न –  नगराध्यक्ष रमण भोळे–
नॅशनल फिल्म पथकातील अधिकारी हे व्हिडीओ छायाचित्रीकरण करण्यासाठी शहरात आलेले आहेत.
दिनदयाल नगरात या पथकास विरोधी गटाच्या नगरसेवकांनी वकार्यकर्त्यांनी तेथे गोंधळ घालत दमदाटी केली. त्यानंतर जनाधारच्या  नगरसेवकांनी नगरपालिकेत येवून मुख्याधिकाNयांशी अरेरावीची भाषा केली. आम्ही त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काही एक एकूण घेतले नाही.·

नगरसेविका पती यांना ससत्ताधाऱ्यांनी केली दमदाटी -गटनेता उल्हास पगारे
शासनाने पाठविलेले व्हिडीओ छायाचित्रीकरणासाठी आलेल्या  कोणत्याही अधिकाNयांना जनाधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी  दमदाटी केलेली नाही. आलेल्या पथकास  भेटण्याकरीता आम्ही जात असतांना नगराध्यक्ष रमण भोळे,  मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर व नगरसेवक हे आमच्यावर धावून आले. आम्ही त्यांना चर्चा करण्याची विनंती केल्यावरही त्यांनी पालिकेच्या गेटमधून आम्हास आत येवू दिले नाही. जनाधारपार्टीच्या  प्रभाग व्रंâ. १५ च्या नगरसेविका शबानाबी सिकंदर खान यांचे पती सिकंदर खान यांना अरेरावीची भाषा वापरुन दमदाटी केली. त्यांच्या प्रभागातील कामे होत नसल्याने  त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ते तेथे आले  होते.·
नगरपालिकेत यांची होती उपस्थिती
माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर, शिक्षण सभापती बोधराज चौधरी, नगरसेवक मुकेश पाटील, नगरसेवक महेंद्र ठाकूर , देवेंद्र वाणी, परिक्षित बNहाटे, निक्ती बत्रा, किरण कोलते, दिनेश नेमाडे, विरोधी गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक दुर्गेश ठाकुर,  सिकंदर खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.