Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भुसावळ-देवळाली पॅसेंजर विलंब न होता वेळेवर धावावी
    जळगाव

    भुसावळ-देवळाली पॅसेंजर विलंब न होता वेळेवर धावावी

    By January 31, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ट्रेन लाईव्ह संघटनेचे डी. सी. एम. यांना निवेदन
    पाचोरा (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे स्थानकावरुन दररोज भुसावळ ते नाशिकरोड पॅसेंजर (क्रं. अप – ५११८१) ही भुसावळ स्थानकावरुन सायंकाळी निघाल्यानंतर या पॅसेंजर गाडीला जळगांव, शिरसोली अथवा माहेजी या स्थानकावर दिर्घकाळ थांबविण्यात येते. व एक्सप्रेस गाड्या पुढे काढण्यात येतात. यामुळे अंतिम स्थानका पर्यंत पोहचण्यास विलंब होतो. यामुळे ग्रामिण भागातील नागरिकांना दिरंगाईला सामोरे जावुन रात्री – अपरात्री प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांना होणाऱ्या या त्रासाची ट्रेन लाईव्ह संघटनेने दखल घेत डी. आर. एम. अरुण कुमार यांना संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. डी. आर. एम. अरुण कुमार यांनी यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांचेशी समस्यांबाबत सविस्तर चर्चा करत सांगितले की, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जी.एम.) संजीव मित्तल यांचा भुसावळ डिव्हीजन दौरा दि. ३१ जानेवारी रोजी दौरा आहे. दिलीप पाटील यांनी डी. आर. एम. यांना जी. एम. संजीव मित्तल यांचेशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला असता यावर डी. आर. एम. म्हणाले की, हा दौरा आॅफिशियली असुन यात लोक प्रतिनीधी यांचेसोबत चर्चा करण्यासाठी वेळ नसणार आहे. आपल्या मागण्या संदर्भात जी. एम. संजीव मित्तल यांचे सोबत सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासित केले आहे.
    अशा आहेत ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेच्या मागण्या गीतांजली एक्सप्रेस पाचोरा थांब्याबाबतचे व मूलभूत सुविधांबाबतचे तसेच भुसावळ – नाशिकरोड (क्रं. अप ५११८१) ही पॅसेंजर रोजच उशिराने धावते ती वेळेवर धावण्यासाठी योग्य पाऊल उचलणे, चाळीसगांव स्थानकावरील पार्किंगचा मोठा प्रश्न अशा मुलभुत समस्यांचे निवेदन डी. आर. एम. अरुण कुमार यांना दिले. यावेळी ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील, सहसचिव सौरभ पाटील, पराग बढे, नितीन सोनवणे व आदी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. समस्या सोडविण्यासाठी उच्चस्थरावर नक्कीच प्रयत्न होतील असे आश्वासन डी. सी. एम. यांनी संघटनेला दिले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif