भुसावळ देवळाली पॅसेंजर रद्द

0

भुसावळ- भुसावळ येथून देवलाली येथे जाणारी भुसावल देवलाली पॅसेंजर तब्बल महिनाभरासाठी रेल्वे प्रशासनातर्फे रद्द करण्यात आली आहे. रेल्वे रद्द झाल्यामुळे प्रवाशी व चाकरमान्या वर्गात हाल सहन करावे लागणार आहे.

भुसावळ येथून दररोज देवलाली कडे जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ देवलाली शटल सुरू केली आहे मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही रेल्वे दिनांक 22 जुन ते 20 जुलै पर्यंत रद्द करण्यात येणार आहे. तसेच देवलाली ते भुसावळ पॅसेंजर ही 23 जून ते 20 जुलै पर्यंत रद्द करण्यात आली आहे. दरम्यान देवलाली पॅसेंजर मध्ये भुसावळ येथून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तसेच चाकरमानी वर्गदेखील कामावर जाण्यासाठी या गाडीचा वापर करीत असतात मात्र तांत्रिक कारणास्तव ही गाडी बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे तसेच चाकरमान्या वर्गाचे मोठ्याप्रमाणावर हाल होणार आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.