भुसावळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी शिवसेनेचा रास्ता रोको

0

भुसावळ :- भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या न्याय व हक्कासाठी भुसावळ तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी मधुकर सहकारी साखर कारखाना फैजपुर येथे कारखान्याला ऊस दिलेला असेल परंतु सदर उसाचे पेमेंट मिळाले नसेल तसेच कारखान्याकडून इतर रकमा मिळाल्या नसतील अशा शेतकरी बांधवांच्या दिनांक 17 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत “रस्ता रोको “आंदोलन आयोजित करण्यात आले आहे .

तसेच लवकरात लवकर या शेतकऱ्यांचे कारखान्याकडे येणे बाकी असतील त्या शेतकर्‍यांनी आपली नावे आपल्या परिसराती मार्फत किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यां मार्फत जिल्हा प्रमुखांकडे पाठवावेत किंवा समाधान महाजन तालुका प्रमुख शिवसेना यांच्या वरणगाव येथील बस स्टँड चौकातील कार्यालयात येऊन द्यावीत अथवा ( मोबाईल नंबर 8484996499 ) निलेश सुरडकर व( 8668835464) नीलेश ठाकूर या क्रमांकावर नोंदवावीत असे आवाहन भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

या आंदोलनात भुसावळ तालुका शिवसेना परिवार सहभागी होणार असून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी सदैव शेतकऱ्यांच्या सोबत आहे याकरिता जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर भुसावळ तालुक्यात शिवसेना प्रणित शेतकरी सेनेची स्थापना करण्यात येणार असून शेतकऱ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ व हक्काची शिवसेना निर्माण होणार आहे सदर शेतकरी सेनेमध्ये सहभागी व्हावे असे सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणाऱ्या या शेतकरी सेनेत सर्वानी सहभागी व्हावे असेही आवाहन भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.