भुसावळ-कटनी पॅसेंजर दोन दिवस रद्द

0

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ- कटनी पॅसेंजर दोन दिवसांसाठी रद्द राहणार आहे.रेल्वे प्रशासनातर्फे इटारसी-जबलपूर दरम्‍यान सोनतलाई व बागरटावा मध्‍ये दुस-या लाईनचे व नॉन इंटरलॉकिंगचे कार्य होणार असल्‍याने भुसावळ-कटनी पॅसेंजर गाडी क्रमांक ५११८७ डाऊन ही गाडी दिनांक १६ व १७  फेब्रुवारी रोजी दोन दिवस प्रस्थान स्थानकावरुन रद्द राहील.

तर गाडी क्रमांक ५११८८अप कटनी-भुसावळ पॅसेंजर ही दिनांक १६ फेब्रुवारी  रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द राहील असे भुसावळ रेल वाणिज्‍य विभागाने कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.