Sunday, January 29, 2023

भुसावळ आगारातून निघालेली एसटी अज्ञाताने फोडली

- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ आगारातून आज बोदवड येथे प्रवासी घेऊन जाणारी बस निघाली होती, ही बस दीपनगर जवळ अज्ञात व्यक्तीने दगड मारून फोडली आहे.  हा प्रकार अचानक सुरू झाल्यामुळे प्रवासी गोंधळून गेले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली एसटी आज भुसावळ आगारातून धावत असतांना एमएच २० बीएल ०९४७ या क्रमांकांची बस प्रवासी घेऊन बोदवड येथे निघाली असताना दिपनगरजवळ अज्ञात लोकांनी बस वरती दगडांचा मारा केला.

- Advertisement -

यात सुदैवाने प्रवाशांना कोणीतीही इजा झाली नाही. यामध्ये बसचे नुकसान झाले असून बस प्रवासी घेऊन जाणारी बस जागेवरच थांबवण्यात आली आहे. या ठिकाणी भुसावळ पोलीस स्टेशनचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी दाखल झाले आहेत.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे