भुसावळा गावठी कट्टा व लोखंडी चॉपर बाळगणार्‍या दोघांना अटक

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  शहरातील दोघा संशयीतांकडे गावठी कट्टा व चॉपर असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत दोघांना अटक केली. गौरव शरद शिरोळे 22, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ व संजय जनार्दन इंगळे 20. रा.भारत नगर, भुसावळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

शिरोळे याच्याकडूनन पाच हजार किमतीचा गावठी कट्टा तर इंगळे याच्याकडून नऊ इंच लांबीचा लोखंडी चॉपर जप्त करून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीत गौरव शिरोळे हा महात्मा फुले नगरात गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली व आरोपीच्या कमरेला लावलेला पाच हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला तसेच संजय जनार्दन इंगळे 20, रा.भारत नगर यांच्याकडून नऊ इंच लांबीचा लोखंडी चॉपर जप्त करण्यात आला.

ही कारवाई भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मोहम्मद अली सैय्यद, साहील तडवी, भूषण चौधरी, जितेंद्र सोनवणे, संजय बडगुजर, शेख जाकीर मंसुरी, विकास बाविस्कर आदींच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.