भुसावळ | प्रतिनिधी
शहरात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता कारवाई करीत एका आरोपीस अटक करून त्याच्या ताब्यातून 4 हजार 490 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्यावरुन संशयीत आरोपी कैलास अशोक अग्रवाल वय 32, रा.शिवाजी नगर, भुसावळ तसेच त्याचे सोबत एक अल्पवयीन संशयीताला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे जवळून पान मसाला (गुटखा) जप्त केला असून जप्त माल अन्न पुरवठा अधिकारी साळुंके यांच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणी
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत , सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, किशोर महाजन, रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, तुषार पाटील, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी केली.
