भुसावळात सहा जुगारी जाळ्यात

0

भुसावळ दि . 17 –
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दितील पंचमुखी हनुमान मंदीराजवळील लक्ष्मी अ‍ॅटो गॅरेजच्या बंद खोलीत जुगार खेळणा-यां काना अनिल अग्रवाल, अकबर गवळी, मिलीद सुरेश निकम, महेद्र आनंदा पाटील, वसीम रज्जाक तडवी, अकील भिकारी चौधरी या सहा जुगारीना अटक करण्यात आली.त्यांचे जवळून दहा हजाराच्या रोकडसह जुगाराचे साहित्य, तीन मोटार सायकली, सहा मोबाईल असा एकुण 1 लाख 48 हजार 620 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हवालदार शंकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिलीप कोळी, हवालदार साहील तडवी, संजय पाटील, प्रदीप पाटील, शंकर पाटील, भूषण चौधरी, सोपान पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. .

Leave A Reply

Your email address will not be published.