भुसावळात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न

0

सँनीटायझर मशीन(स्टैंड)चे लोकार्पण

भुसावळ (प्रतिनिधी) : – शिवसेनेच्या ५४ वा वर्धापन दिन भुसावळ शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला. स्व. बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणी नुसार ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्टेशन परिसरात व सराफ बाजार मार्गे वारणाऱ्या जनतेच्या आरोग्याची काळजी लक्षात घेवून लक्ष्मी चौक शिवसेना शाखेतर्फे लक्ष्मी चौक व रेल्वे स्टेशन नजिक शिवभोजन सेंटर जवळ सॅनीटायझर मशिन (स्टैंड) चे लोकार्पण १९ जून रोजी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अँड. जगदीश कापडे व शिवसेनेचे उपजिल्हाधिकारी अँड श्याम गोंदेकर, यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ, युवासेना तालुका प्रमुख हेमंत ब-हाटे, ज्येष्ठ शिवसैनिक दिवाकर विसपुते, शिववाहतूक सेनेचे हेमंत खंबायत,अमोल भालेराव, मिलिंद कापडे, धीरज वरढोनकर, श्री.हिंगणे,  माज़ी विभागप्रमुख उमाकांत (नमा)शर्मा आदि शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

जनसेवेचा वारसा व महाराष्ट्र रक्षणाचे कार्य शिवसैनिक व शिवसेनाच करु शकते. आज ५४ वर्ष शिवसेना स्थापनेला झाले मात्र जनतेच्या मनात शिवसेनाच राज्य करते आहे . आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून गोरगरीबांसह सर्वसामान्य जनतेच्या हिता करीता अहोरात्र कार्य करतो प्रसंगी बिकट परिस्थितीत फक्त शिवसेना व शिवसैनिकच येतात हे शिवसैनिक उमाकांत(नमा)शर्मा यांनी सैनिटाइजर मशीन(स्टैंड)लावून सिद्ध केले असे मत माज़ी शिवसेना जिल्हाप्रमुख जगदीश कापडे यांनी यावेळी मनोगतात व्यक्त केले .या कौतुकास्पद कार्याबद्दल सर्वानी उमाकांत(नमा)शर्मा यांचे कौतुक करून धन्यवाद दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.