भुसावळात रिपाईच्या जिल्हा बैठकीत विविध विषयांवर चर्चा

0

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती राजू सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात नियोजन व पक्षातील रिक्तपदे भरण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विधानसभेच्‍या जागेसंदर्भात चर्चा करणे,हक्‍काच्‍या संपूर्ण जागा मिळण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात फिरून पक्षाची बांधणी करण्याचे निश्चित करण्यात आले.युवा जिल्हा कार्याध्यक्षपदी गिरीश तायडे यांची या बैठकीत निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास खान्देश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव,युवा जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे,प्रकाश सोनवणे,जिल्हा सचिव पप्पू सुरडकर,विश्वास खरात,योगेश तायडे,बाळू सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.