भुसावळात रमजान ईद उत्साहात साजरी

0

शांतता व पावसासाठी प्रार्थना
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात मुस्लीम समाजात महत्वाची रमजान ईद शहरातील विविध मशिदी, जामनेर रोड व खडका रोड भागातील ईदगाहमध्ये आज दि. 16 जून रोजी नमाज पठन करुन जगभरात शांतता नांदावी व पावसासाठी प्रार्थना करुन अत्यंत शांततेत साजरी करण्यात आली.
सकाळी सर्व प्रथम जाममोहल्ला, गौसिया, अन्सारुल्लाह, मरकज, पंजाबी, नुरानी, हिंदुस्तानी, सातारा आदी मशिदींमध्ये त्यानंतर जामनेर रस्त्यावरील जुन्या ईदगाह मध्ये हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज पठन केली. सर्वात मोठ्या खडका रोड भागातील नवीन ईदगाहमध्ये जाममोहल्ला मशिदीचे मौलाना फरीद रजा खान यांच्या मागे उभे राहून सकाळी 9.30 वाजता सुमारे 10 ते 15 हजार समाज बांधवांनी नमाज पठन केली. नमाज पठनानंतर जगभरात शांतता व पावसासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा. सुनिल नेवे, भाजपा गटनेते हाजी मुन्ना तेली, मनोज बियाणी, राजू सुर्यवंशी, जनआधार पार्टीचे सचिन चौधरी, गटनेते उल्हास पगारे, हाजी आशिक खान, प्रदिप देशमुख, सचिन पाटील, कृऊबा सभापती सोपान भारंबे, नितीन धांडे, वसंत पाटील, प्रमोद नेमाडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र निकम, मुकेश गुंजाळ, सतिष सपकाळे, ग्रावइ रमेश काठोके, कैलास गव्हाणे, शैलेश अहिरे, राजू खरारे, पवन नाले, खडक्याचे माजी सरपंच चुडामण भोळे, शामसिंग पाटील, अनिल महाजन, संजयसिंग पाटील, भानुदास कोळी, गजानन सरोदे, तलाठी कुंवर अप्पा, सहाय्यक पोलीस अधिक्षक नीलोत्पल, नायब तहसिलदार संजय तायडे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सपोनी मनोज पवार, आदींची उपस्थिती होती. पोलीस विभागातर्फे ईदगाह परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान ईदगाह मैदानावर अप्पर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांनी पथकासह भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. यशस्वीतेसाठी ईदगाह कमेटीचे अध्यक्ष डॉ. मेहमूद हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव अल्लाबक्ष शाह, कोषाध्यक्ष डॉ. रफिक अहमद, हाजी रहिम शाह, तसलीम खान, रमजान शेख, हाजी तसलीम नजमोद्दीन, सादीक खान, शब्बीर बागवान, अशरफ अली, अय्युब बागवान, ईलाही सेठ आदींनी परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.