भुसावळात रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण

0

विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली ; बाजारपेठेत गर्दी

भुसावळ :- मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्याला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. या निमित्ताने शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यानिमित्त शहरातील अमरदीप टॉकीज चौकात विविध खाद्य पदार्थाचे दुकाने थाटली आहे यादुकांना मध्ये खरेदी करीता शहरातील बहुतेक मुस्लिम भागांमधून बालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने येतात.

महिनाभर मुस्लिम बांधव रोजे म्हणजेच उपास ठेवतात. इस्लाम धर्मामध्ये याला खूप महत्त्व आहे. लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत रोजे ठेवतात.मुस्लिम बांधव सकाळी चार वाजेपासून रोजे ठेवण्यासाठी तयारीला लागतात सकाळी 6 वाजेपासून सहरीला सुरुवात केली जाते. दिवसभर रोजा ठेवल्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर रोजा सोडण्यात येतो. रोजा सोडण्यासाठी खारीक किंवा गोड पदार्थाचा वापर केला जातो. रमजान महिन्याचे( उपवास) रोजे सुरू झाले असल्याने पूर्वसंध्येला भुसावळ बाजारपेठेमध्ये मुस्लिम बांधवांनी विविध खाद्य पदार्थाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती .यंदा भर उन्हाळ्यात रमजान चे उपवास आल्याने कलिंगड, खरबूज, आंबे, केळी, द्राक्ष ,यासह गारवा देणारे फळाची आवक वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.