भुसावळात युवकावर प्राणघातक हल्ला

0

 

प्रतिनिधी / २६ जून

भुसावळ : जुन्या भांडणावरुन शहरातील जामनेर रोडवर असलेल्या गोरक्षण समोर आज २६ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. संशयित हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली.

शहरातील दिनदयालनगरमधील रहिवाशी सलीम घोडेवाला याच्या बहिणीचा मुलगा गोलु (पुर्ण नाव माहित नाही) याचा व धिरज राणे यांच्यामध्ये १ जून रोजी कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला होता. त्या दिवशी धिरज राणे याला मारण्यासाठी गोलू गल्लीमध्ये मुले घेऊन आला. त्यावेळी दर्शन सुरेश ठावूâर (वय २२) रा. आनंद नगर, बिजली कॉलनी भुसावळ याने तुझी दादागिरी बाहेर दाखव गल्लीत मुले आणू नको असे म्हटल्याचा राग आल्याने आज २६ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास दर्शन सुरेश ठावूâर हा नाहाटा कॉलेज कडून घरी येत असतांना सलीम घोडेवाल्याच्या बहिणीचा मुलगा गोलू याने रस्त्यात थांबवून शिवीगाळ करुन त्याच्या कमरेतून चावूâ काढून फिर्यादीच्या डाव्या दंडावर प्राण घातक हल्ला केला. घटनेनंतर संशयित गोलू व त्याचा एक साथीदार (नाव माहिती नाही) हे फरार झाले. दर्शन सुरेश ठावूâर याला त्याचे काका जितेंद्र मधुकर ठावूâर तसेच दिलीप मोहन ठावूâर यांनी उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील गोदावरी रुग्णालयात हलविले आहे. याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय युवराज नरवाडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.